सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

आंबा येथे 6 गाईंचा मृत्यू, विजेचा शॉक लागल्याने घडला अनर्थ,बैलपोळ्याच्या उत्साहावर पडले विरजण

आंबा प्रतिनिधी कैलाश बोनगे
आंबा येथे दरवर्षी पारंपारिक पद्धतीने अतिशय उत्साहामध्ये बैलपोळा साजरा केला जातो मात्र यावर्षी बैल मिरवायच्या वेळेलाच अचानकपणे काळाने घाला घालत विजेचा शॉक लागून सहा गाईंचा मृत्यू झाल्याने पोळा सणाच्या उत्साहावर विरजण पडले असून गावातील मोकाट गाई अचानकपणे मृत झाल्यामुळे गावकरी दुःखाच्या सागरात बुडाले आहेत
    शेतामध्ये रानडुक्कर येऊ नयेत यासाठी लावलेल्या कुंपणा शेजारी या गाई गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असून अतिशय हृदय पिळवटून टाकणारी घटना गावात घडल्यामुळे गावावर शोक काळा पसरली असून गावातील
बैलपोळ्याच्या आनंदावर विरजण पडले आहे पारंपरिक पद्धतीने या गावांमध्ये नियमितपणे वेगळ्या उत्साहामध्ये पोळा हा सण साजरा केला जातो या ठिकाणची कृषक आपल्या बैलांना सजवून त्यांची भव्य मिरवणूक काढत असतात या गावातील पोळ्याला एक वेगळी महत्त्व असून मारुतीचे मंदिर नसणारे हे परतुर तालुक्यातील एकमेव गाव आहे या गावांमध्ये बागेश्वरी मातेचे दर्शन करून पोळ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होते मात्र अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे गावकरी दुःखाच्या सागरात बुडाले असून यावर्षीची बैलांची पूजा घरचे घरी करताना आढळून आले यासंदर्भामध्ये युवा मोर्चा कार्यकर्ते प्रशांत बोनगे यांच्याशी चर्चा केली असता यावर्षीचा पोळा आनंदात साजरा करण्याच्या मी ठरवले होते परंतु काळाने घाला घालत अचानकपणे सहा गोमातेचा मृत्यू झाल्यामुळे आमचं संपूर्ण गाव दुःखाच्या सागरात बुडालेली असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत