सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची प्रेरणा युवा पिढीने घेणे गरजेचे- शिवाजी भालेकर राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष


प्रतिनिधी हनुमंत दवंडे
पारडगाव तालुका घनसावंगी येथे बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती पारडगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .तसेच शिवाजी भालेकर यांनी जयंती निमित्ताने अण्णाभाऊ साठे यांचे विचार प्रत्येक युवा पिढीने घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले .
यावेळी उपस्थित.राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष शिवाजी भालेकर, चंद्र भूषण जयस्वाल, विष्णू माकोडे ,अंबादास वडे, अक्षय आढाव, फिश नाटकर प्रसाद सुतार ,शाकीर कुरेशी ,चौधरी, भगवान वढे, रामेश्वर ढेरे, सचिन ढेरे, खालीद कुरेशी,संतोष सुतार ,प्रसाद सुतार,फिलिप नाटकर,राजू सुतार,अनिल नाटकर,विनोद सुतार,अविनाश सुतार,अमोल सुतार,दीपक सुतार,मनोहर जाधव,सतीश जाधव, आदींची उपस्थिती यावेळी होती.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत