सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्व. अनिल जिंदल परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर जालना येथे उत्साहात साजरा


जालना सुभाष वायाळ
     दि.१८माय नेशन माय प्राइड आज़ादी का महोत्स्तव लायंस क्लब ऑफ़ जालना डायमंड डिस्ट्रिक्ट ३२३४ एच-२ तर्फे नगर परिषद शाळा संभाजी नगर,जालना येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम सपन्न झाला.
 .   .यावेळी राष्ट्रगीताची सुरुवात करुन विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य सादर केले.तसेच लायंस क्लब ऑफ़ जालना डायमंड तर्फे निबंध , वकृत्व , चित्रकला , रांगोळी , वादविवाद , नृत्य घेण्यात आलेल्या स्पर्धांचे पारितोषिक वाटप करण्यात आले , क्लब तर्फे शाळेला कंप्यूटर संच वितरण करण्यात आले व मुलांना बिस्किटे पैकेट चे वितरण केले. यावेळी क्लब चे झोन चेयर पर्सन लॉ मीनाक्षी दाड , लॉ विजय दाड , अध्यक्ष लॉ दिनेश राम सिनगारे , सेक्रेटरी लॉ संजय पित्ती , योगेश सोनुने , दिपक चरखा , सुभाष फत्तेलष्कर संतोष भालेराव बाबासाहेब खिल्लारे गजानन गायकवाड राजू ढाकणे समद मणियार विलास जगधने जयेश मेहता शिवरतन डवले श्रीमती सुनंदा वैष्णव श्रीमती कांचन काळे श्रीमती माधुरी भालेराव सौ.कल्याणी महालकर शाळेचे मुख्याध्यापक राजेश मुंडलिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत