सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे उपोषणाला उपस्थित राहावे-अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना

 जालना प्रतीनीधी समाधान खरात
जालना जिल्ह्यातील विविध प्रकारच्या हजारोच्या संख्येने दिव्यांग असून दिव्यांगसाठी ठोस असे कोणतेही धोरण शासनाने राबविलेले नाही व दिव्यांगाचे कायदे जीआर हे कागदपत्रे राहिलेले आहेत
      तसेच सन 1995 चा अपंग पुनर्वसन कायदा सन 2001 चे महाराष्ट्राचे दिव्यांग धोरण व सन 2016 चा अपंग हक्क संरक्षण कायदा याची देखील अमलबजावणी होत नाही याकरिता दिव्यांगाच्या संपूर्ण कल्याण व पुनर्वसनासाठी महाराष्ट्र शासनाने महिला बालकल्याण व मागासवर्गीय मंत्रालय प्रमाणे दिव्यांगाचे स्वतंत्र मंत्रालय व विभाग तयार करावा यासाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री  आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशानुसार तसेच प्रहार अपंग संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मा बापूराव काणे , राज्य संपर्कप्रमुख रामदास खोत  , मराठवाडा अध्यक्ष शिवाजी गाडे  यांच्या  नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे 25 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता दिव्यांग बांधवांनी उपोषणा करीता उपस्थित राहावे  व असे आव्हान अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना , विठ्ठल  चव्हाण, शंकर शिरगुळे  माजी जि. अध्यक्ष हनुमान माने ,बाळासाहेब , रवींद्र अंभोरे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर आडे माऊली कदम आबाजी भुंबर शेख फिरोज यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत