सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

उपविभागीय कृषी अधिकारी सोनकांबळे यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करून,जिल्हा कृषी अधिकारी यांची सुद्धा चौकशी करा प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना

प्रतिनिधी परतुर हनुमंत दवंडे 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मा.मुख्यमंत्री यांना. जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत निवेदन देऊन मागणी करण्यात आली निवेदनात पुढे म्हटले आहे की,उपविभागीय कृषी अधिकारी परतुर  गजानन सोनकांबळे यांनी १ लाख रुपये घेत असतांनी अँटी करप्शन ब्युरो जालना सापळा रचून कारवाई करूनअटक करण्यात आली, 
     उपविभागीय कृषी अधिकारी परतुर  सोनकांबळे यांची पहिली पोस्टींग परतूर येथे झाली होती त्यांची सेवा पूर्ण ३ वर्षे झालेली नाहीत, म्हणून  सोनकांबळे यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे, कारण  सोनकांबळे यांच्या कालावधीत पोखरा योजने अंतर्गत कामे झाली ती सर्व कामे संबंधित बोगस आहेत, पोखरा या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना जो लाभ मिळतो तो संबंधित डीलर यांनी श्री सोनकांबळे यांना हाताशी धरून कोट्यावधी रुपयाची लुटमार करून बिल मंजूर करून घेतले, त्याची चौकशी करून संबंधित शेतकऱ्यांना साहित्य पुरवणाऱ्या डीलर कडून रिफंड पैसे वसूल करण्यात यावेत, तसेच  गजानन सोनकांबळे उपविभागीय कृषी अधिकारी परतुर संपत्तीची चौकशी व त्यांच्या नातेवाईकाची चौकशी संपत्ती जप्त करण्यात यावी,  सोनकांबळे यांच्या कालावधीमध्ये झालेल्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून मोठ मोठ्या कंपन्याचे डीलर यांनी उपविभागीय कृषी अधिकारी  सोनकांबळे या अधिकाऱ्याला मॅनेज करून कोट्यावधी रुपयाचे बिल उचलून घेतले त्याची चौकशी करून त्या संबंधित डीलर झालेले बोगस कामे केली याची शासनाने वसुली करावे,  सोनकांबळे उपविभागीय कृषी अधिकारी परतुर यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट मार्गाने वसुली करुन तो भ्रष्ट पैसा जिल्हा कृषी अधिकारी यांच्या पर्यंत पोहोचला का याची सुद्धा चौकशी होणे आवश्यक आहे, जनहितार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अपेक्षा आहे नवीन येणाऱ्या उपविभागीय कृषी अधिकारी परतुर यांनी संबंधित शेतकऱ्यांचे पारदर्शक कामे करून सहकार्य करावे भ्रष्ट उपविभागीय कृषी अधिकारी परतुर  गजानन सोनकांबळे व जिल्हा कृषी अधिकारी जालना यांचे कनेक्शन आहे,म्हणून सोनकांबळे यांच्या कालावधीत झालेल्या कामांची चौकशी करून संबंधित शेतकऱ्यांना विविध शेती साहित्य पुरवठा करणाऱ्या सर्व डीलरची चौकशी करून दिलेल्या बोगस बिलाची वसुली करून  सोनकांबळे यांना कायमस्वरूपी बडतर्फ करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे...

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत