सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतुर विश्रामगृह येथे समाजवादी पार्टीची आढावा बैठक संपन्न...


परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
    दिनांक 12/ 8/ 2022 रोजी दुपारी 3:00 वाजता परतुर विश्रामगृह येथे समाजवादी पार्टीची आढावा बैठक संपन्न झाली .या बैठकीमध्ये जालना जिल्हाध्यक्ष नबी  शिपुरकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले 
    या वेळी बोलताना ते म्हणाले की आगामी येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता प्रत्येक नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा निवडणूक समाजवादी पार्टी स्वबळावरती निवडणुका लढवणार आहे. कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे ,समाजवादी पार्टीचे ध्येय धोरण लक्षात घेऊन आगामी काळात समाजवादी पार्टीच्या उमेदवाराला भरभरून मते कसे मिळतील याचा प्रचार प्रचार करण्यात यावा .बुथ प्रमुखाची कमिटी नेमण्यात यावी. आदी विषयावरती चर्चा करण्यात आली . तसेच परतूर तालुक्यामधील काही कार्यकर्त्यांच्या निवडीची पत्रे जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आली आहेत .
समाजवादी पार्टी प्रवेश करणारे कार्यकर्ते बबनराव सुतार, भगवान वाघमारे, शहानवाज कुरेशी, सरफराज कुरेशी ,जावेद तोहित कुरेशी , फय्याज बागवान, अजीम शेख ,यासीम शेख, मुसा बागवान, ,कुरेशी ,रईस वजीर कुरेशी, यावेळी
नबीबाई शिपुरकर जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी जालना, शेख मुजीब  जिल्हा सचिव, खतीब खान शहराध्यक्ष जालना, अबूज कयूम खान जिल्हाध्यक्ष जालना, डॉ. रणसूर साहेब आष्टी, शेख निसार परतूर तालुकाध्यक्ष, संजय खनपटे शहराध्यक्ष परतूर, शेख मुनीर, सौदागर शेख मेहबूब भाई , आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय खणपटे यांनी केले आहे.
 ,

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत