सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

डॉ.धोंडोपंत मानवतकर आज आकाशवाणीवर ,महाराष्ट्राच्या सर्व आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणार आहे.

मंठा प्रतीनिधी सुभाष वायाळ
मराठवाडयातील सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर यांचे  आज दि.२२ ऑगस्ट रोजी आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून सायंकाळी ठीक ६:३५ वाजता "साहित्य सौरभ" या मालेत काव्य वाचन होणार आहे.
      " एफ.एम.101.7 आकाशवाणी औरंगाबाद सर्व जनात सर्वांच्या मनात " ही आकाशवाणी औरंगाबाद केंद्राची निर्मिती असून हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या सर्व आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणार आहे.
      हा कार्यक्रम प्रत्यक्ष रेडिओवर किंवा Newsonair ही App डाउनलोड करून ऐकता येईल. 
        मंठा येथील कवी डॉ.धोंडोपंत मानवतकर हे कवी लेखक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांचे अंतरसाक्षी, रुपांतर, ओढाळ सुरांच्या देही, व लोकशाहीचा जाहीरनामा हे कवितासंग्रह प्रकाशित असून विद्रोही साहित्याचा निर्माता, व काव्यप्रभा ही पुस्तकेसुद्धा प्रकाशित आहेत. मंठा, जि. जालना येथील आविष्कार साहित्य मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष असून गेली ४० वर्षापासून ते लेखन करतात व तीस वर्षापासून आविष्कार साहित्य मंडळाद्वारे वाङ्मयचळवळ चालवतात.
     अनेक कविसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले असून विविध कविसंमेलनात व शिबिरात त्यांनी निमंत्रित कवी म्हणून सहभाग नोंदवला आहे. लेखक, कवी, पत्रकार, चित्रकार, संपादक, प्रकाशक व सामाजिक कार्यकर्ता अशा विविध माध्यमातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण कवींच्या कवितेवर संशोधनपर ग्रंथ विद्यापीठात सादर करून कवितेवर पीएच्.डी ही उच्चविद्याविभूषित पदवी प्राप्त केलेली आहे.
    "आकाशवाणी औरंगाबाद सर्व जनात सर्वांच्या मनात" या कार्यक्रमाचा काव्यप्रेमींनी व रसिक श्रोत्यांनी डॉ.धोंडोपंत मानवतकर यांच्या काव्य वाचनाचा अवश्य लाभ घ्यावा.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत