सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर शहरातील वडारवाडी व नागसेन नगर भागात मोहन अग्रवाल यांच्या प्रयत्नाने २० लक्ष रुपयाचे विद्युत पोल ट्रान्सफॉर्मरचे काम सुरू!



परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
        आज परतूर शहरातील वडारवाडी परिसरात भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच अधिकृत विजेचे कनेक्शन मोहन अग्रवाल यांच्या प्रयत्नाने पूर्ण झाले. गेल्या कित्येक वर्षापासून या भागामध्ये जवळपास एक किलोमीटर लांबून लोकांनी बारीक वायर द्वारे विजेचे आकडे टाकून लाईन घेतली होती. 
     परंतु सत्ताधारी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी जाणूनबुजुन या भागाकडे दुर्लक्ष करून नागरी सुविधा पुरविण्यात असमर्थ्यता दाखवली. ही बाब तेथील नागरिकांनी दीपक हिवाळे यांचे माध्यमातून मोहन अग्रवाल यांच्याकडे मांडली असता त्यांनी सदरील प्रश्नावर तात्काळ महावितरण कार्यालय परतुर जालना व औरंगाबाद या ठिकाणी महावितरण कार्यालयातील अभियंत्याशी चर्चा करून व गेल्या वर्षभरात पाठपुरावा करून ३९ विजेचे खांब व शंभर चा ट्रांसफार्मर मंजूर करून त्या भागातील लोकांना विद्युत पुरवठा करून न्याय देण्याचे काम केले. त्यामुळे तेथील नागरिकांनी आज मोहन अग्रवाल यांना बोलावुन वडारवाडी व नागसेन नगरातील नागरीकांनी सत्कार केला. यावेळी अमोल सुरूंग ,दत्ता अंभोरे ,दीपक हिवाळे यांची उपस्थिती होती. या भागातील जवळपास ४०० ते ५०० महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत