सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

पैठणच्या जायकवाडी धरणातील पाणी गंगापात्रात सोडल्याने व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करा आमदार लोणीकर यांच्या तहसीलदारांना सूचना

जालना प्रतिनिधी समाधान खरात 
जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात गोदावरी नदीकाठच्या गावात पैठण च्या जायकवाडी धरणातील पाणी गोदापात्रात सोडल्यामुळे व सतत पडणाऱ्या पावसामुळे नदी नाल्याला आलेल्या पूरांमुळे नदीचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसले नदीकाठच्या गोळेगाव चांगतपुरी सावरगाव गंगासांगवी येथील शेतकऱ्यांच्या शेतात गोदावरी नदीचे पाणी शिरल्यामुळे तेथील सोयाबीन कापूस मूग उडीद तुर अशा अनेक पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे अशावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी याची तात्काळ दखल घेत परतुर तहसीलदार यांच्याशी ध्वनीवरून संपर्क साधला व तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले आहेत..!
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा याची काळजी घेण्यासंदर्भात देखील लोणीकरांनी सूचना केली यावेळी दूरध्वनीवरून तहसीलदार यांना बोलताना आमदार लोणीकर म्हणाले की अतिवृष्टी किंवा सततच्या पावसाने ते 33 टक्के पेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले असेल तर त्या पिकांचे पंचनामे करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत त्यामुळे शासनाच्या आदेशाची वाट न पाहता ते 33 टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेले आहे त्यामुळे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला द्याव्यात असेही लोणीकरांनी यावेळी स्पष्ट केले...!

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत