सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मंठा येथे आ.भा.मराठा महासंघा तर्फे कै.अण्णासाहेब पाटील यांची जयंती साजरी

मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
 दि.२६ अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माथाडी कामगार चळवळीची प्रणेते कै.अण्णासाहेब पाटील यांची रविवारी ८९ वी जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमास भाजपचे माजी मंत्री,विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थित होती.
                      यावेळी व्यासपिठावर संदीप भैया गोरे,सतीश निर्वळ,गणेश रावजी खवणे,सुभाष राठोड,उदय बोराडे,भाऊसाहेब गोरे,बबनराव गणगे,कैलास सरकटे बीड थोरात महादेव वायकर,सोपान वायाळ,अंकुश वायाळ नाथराव काकडे भगवान महाराज सरकटे विष्णुपंत महाराज डॉ. देशमुख सुधाकर सरकटे शिवाजी जाधव सर्वांनी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन माजी मंत्री तथा विधानसभा लोकप्रिय आमदार बबनराव लोणीकर यांनी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ मंठा तालुका अध्यक्ष श्री बाळासाहेब देशमुख यांनी प्रास्ताविक आणि भाजप राज्याचे आध्यात्मिक आघाडीचे सदस्य भगवानराव महाराज सरकटे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी "पुढच पाऊल" या पुस्तकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या उपस्थितांना समोरीत करतानी राज्याचे माजी मंत्री तथा आमदार लोणीकर मनाली की मराठ्यांना एकत्रित करून मराठा आरक्षणाच्या बाबतीत आणि माथाडी कामगारांच्या बाबतीत खऱ्या अर्थाने पेटून उठून त्यांच्यासाठी लढा उभारण्याचे काम अण्णासाहेब पाटील यांनी केली २२ मार्च १९८२ च्या मुंबई येथील विराट मोर्चा मराठ्यांना जागे करून गेला आणि मराठ्याच्या मागण्या न मान्य झाल्यामुळे २३ मार्च १९८२ रोजी मराठा समाजासाठी बलिदान केले ते अण्णासाहेब पाटील होते. या कार्यक्रमासाठी मंठा तालुक्यातील अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब देशमुख,मंठा तालुका कोषाध्यक्ष कैलास सरकटे, संभाजी काकडे,गजानन सरकटे,मुकुंद गोटे,अविनाश मोरे,उमेश सरकटे,राहुल देशमुख, शिवप्रसाद शिंदे,प्रवेश येवले,किशोर खंदारे ( किशोर मित्रमंडळ तळणी) बाबासाहेब खंदारे,श्रीकृष्ण खंदारे एकनाथ वायाळ ज्ञानेश्वर वरकड गोविंद वरकड विठ्ठल गायकवाड भागवत सरकटे विष्णू झोल संतोष गोटे ज्ञानेश्वर जाधव महादेव चव्हाण गजानन वरकड योगेश दांडगी योगेश देशमुख माधव खवणे अशोक खवणे यांच्यासह शेकडो युवक उपस्थित होते.
-------------------------
अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री माननीय राजेंद्र जी कोंढरे साहेब यांच्या विचार श्रेणीतून "पुढच पाऊल" या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत