सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्यामुळे गावाला मिळाला पक्का रस्ता,बीबी व पिंपळवाडी येथील गावकऱ्यांनी आमदार लोणीकर यांचे मानले आभार

जालना प्रतिनिधी समाधान खरात 
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बीबी पिंपळवाडी येथील गावकऱ्यांना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्यामुळे कायमचा पक्का रस्ता मिळाल्या मुळे आभार मानले असून रा.मा.227 ते बिबी— पिंपळवाडी रस्ता किंमत 3 कोटी 57 लाख रुपयाचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन मंजुर केला. त्या रस्त्याचे काम पूर्ण झाले त्याचे त्याबद्दल मोजे बिबी येथिल नागरिकांनी आज मा.मंत्री तथा आमदार श्री बबनरावजी लोणीकर यांचा सत्कार केला. 
खरे तर परतूर विधानसभा मतदार संघतील रस्ते विकास करताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी रस्त्यांचे जाळे विणले यामुळे पिंपळवाडी सावरगाव भागडे पाष्टा एरंडवडगाव शिवनगिरी वरखेड टकले पोखरी सेवली वरदडी आदी गावांना रस्ते करून दळण वळणाच्या प्रवहात आणले त्या मुळे आमदार लोणीकर यांनी मतदार संघातील रस्त्यांचा केलेल्या विकास बद्दल
य भाजपा जालना जिल्हाउपाध्यक्ष, श्री ज्ञानेश्वर शेजुळ! महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.जिजाबाई जाधव, दीलीपराव जोशी, शीवराज तळेकर, सावरगाव बिबीचे सरपंच अच्युत अंभोरे, भाजपाचे कार्यकर्ते श्री दीलीप डोळै!प्रल्हाद डोळे, विश्वंभर काकडे,कारभारी काकडे,गजानन कायंदे,पांडुरंग डोळे,योगेश काकडे,उद्धव डोळे,बळीराम डोळे,बाळु भागडे आदींनी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सत्कार केला. व आभार मानले...!!

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत