सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

भागवताचा-र्या हभप सौ. रुपालीताई सवने महाराज यांना 'उत्कृष्ट कीर्तनकार' पुरस्काराने सन्मानित

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
ख्यातनाम कीर्तनकार परतूर तालुक्याचे भूषण सुप्रसिध्द कीर्तनकार भागवताचा-र्या हभप सौ. रुपालीताई रामेश्वर महाराज सवने यांना 'उत्कृष्ट कीर्तनकार' पुरस्काराने पुणे येथे एका  कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्राची संत परंपरा, कीर्तन परंपरा जपणाऱ्या 'मन मंदिरा-गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून 'उत्सव कीर्तनाचा, गौरव कीर्तनकारांचा' हा पुरस्कार सोहळा झी टॉकीजच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. 
या सोहळ्यात दैठना खुर्द येथील रहिवाशी परतूर तालुक्याचे भूषण, महाराष्ट्रातील तमाम वारकरी संप्रदायाचे मानबिंदू सुप्रसिध्द कीर्तनकार भागवताचा-र्या हभप सौ. रुपालीताई रामेश्वर महाराज  सवने यांना 'उत्कृष्ट कीर्तनकार' पुरस्काराने महाराष्ट्राच्या प्रसिध्द गायिका श्रीमती सन्मिता धपाटे  व श्रीमती दिप्तीताई भागवत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील तमाम वारकरी बांधव, संप्रदायातील मंडळींसाठी ही गौरवाची बाब आहे. झी टॉकीजचा हा 'उत्कृष्ट कीर्तनकार' पुरस्कार मिळाल्याबद्दल भागवताचा-र्या हभप सौ. रुपालीताई रामेश्वर महाराज सवने यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत