सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

आनंदवाडी ,रायपुर, शिरसगाव या शिवारात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या सोलार पॅनलचे अतोनात नुकसान.


परतुर प्रतिनिधी हनुमान दवंडे
परतुर तालुक्यातील आनंदवाडी, शिरसगाव ,रायपुर या शिवारात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या सोलर पॅनलचे मोठ्या प्रमाणावर अतोनात नुकसान झाले आहे. 
      अशी तक्रार शेतकरी विठ्ठल सुदाम सावंत यांन सांगितले आहे. याशिवारातील शेतकऱ्यांनी शेतामध्ये बसवलेला सोलार शक्ती या कंपनीचा 3 एचपी चा सोलर बसवलेला होता अचानक मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी व वादळ वारा आला आणि सोलार पंपाचे होत्याचे नव्हते झाले. मोडून तोडून पडलेल्या अवस्थेत त्याची दुर्दशा झालेली आहे त्यामुळे विठ्ठल सावंत या शेतकऱ्यांनी दैनिक परतवाडा टाइम्सशी बोलताना हळहळ व्यक्त केली आहे... तसेच तीन एचपी सोलर हा शक्ती पंप कंपनीचा आहे तरी ह्या कंपनीने माझे झालेले नुकसान भरपाई करून देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी तक्रारी अर्जद्वारे केली आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत