सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर येथे जारकीहोळी यांच्या हिंदूविरोधी वक्तव्याचा युवा मोर्चाच्या वतीने पुतळा जाळून निषेध,युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले आंदोलन,काँग्रेसच्या हिंदू विरोधी वक्तव्याच्या शृंखले चा जोरदार घोषणाबाजी करत युवा मोर्चा कडून तीव्र निषेध

प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
      कर्नाटक काँग्रेसचे नेते सतीश जारकीहोळी याने हिंदू व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणारे वक्तव्य केले तसेच महाराष्ट्रातील काँग्रेस नेते माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी देखील श्रीकृष्णाने भगवद्गीते अर्जुनाला जिहाद शिकवला असे मूर्खपणाचे वक्तव्य केले यांच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा परतुर विधानसभा च्या वतीने माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल भैया लोणीकर यांच्या नेतृत्वात निषेध नोंदवण्यात आला प्रसंगी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले प्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत सतीश जारकीहोळी याच्या पुतळ्याचे दहन करण्यात आलं
यावेळी युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांचा समाचार घेतलाया संदर्भामध्ये युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर यांनी सदरील घटनेचा आपण तीव्र शब्दात निषेध करत असून काँग्रेस हिंदू विरोधी बेताल वक्तव्य करून काय साध्य करू पाहत आहे असा सवाल ही यावेळी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी उपस्थित केला
काँग्रेस खऱ्या अर्थाने जाती धर्मामध्ये तूष्टीकरणाची राजकारण करीत असून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हा आमचा भावनेचा विषय असून आमच्या भावनेशी खेळाल तर याचे परिणाम भोगावे लागतील असा सज्जन ही यावेळी प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी दिला
अति प्राचीन परंपरा असलेला हिंदू धर्म जगातील प्राचीन धर्मापैकी एक धर्म असून या धर्मावर टीका करणारे असे बेताल वक्तव्य करून काय साध्य करू पाहतात असा प्रश्न उपस्थित करीत सदरील वक्तव्याचा आपण तीव्र निषेध करीत असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले
यावेळी रमेश भापकर भगवानराव मोरे दया काटे रामेश्वर तनपुरे सुदामराव प्रधान प्रकाश चव्हाण कृष्णा आरगडे प्रवीण सातोनकर शिवाजी पाईकराव प्रसादराव गडदे गजानन लोणीकर गणेश चव्हाळ राजेंद्र वायाळ गंगाधर पवार विवेक काकडे रामेश्वर चव्हाण बाळासाहेब चव्हाण नरेश कांबळे माऊली सोळंके प्रकाश वाघमारे रामजी मरळ सुनील खरात प्रभाकर जाधव विजय चव्हाण विष्णू मचाले शुभम काठोरे बाळासाहेब सोळंके शिवाजी भेंडाळकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत