सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी योगेश बरीदे तर सचिव पदी सय्यद वाजेद


परतुर,/प्रतिनिधी कैलाश चव्हाण
परतूर मराठी पत्रकार संघाची गुरुवारी (दि.२२) रोजी शासकीय विश्रांम संघाचे अध्यक्ष श्यामसुंदर (मुन्नाभाई) चितोडा याचा अध्यक्षेतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी योगेश बरीदे तर कार्याध्यक्ष पदी शामसुंदर चितोडा, सचिव पदी सय्यद वाजेद,उपाध्यक्षपदी कैलास चव्हाण,कोषाध्यक्ष पदी संजय देशमाने,सह सचिव शेख अथर याची सर्वानुमते बिनविरोधी निवड करण्यात आली.
                      
           यावेळी जेष्ठ पत्रकार शेषराव वायाळ, श्यामसुंदर चितोडा,सुरेश कवड़े,रशीद बागवान, प्रभाकर प्रधान, सागर काजळे,संतोष आखाडे,कैलास सोळंके,संतोष शर्मा , हनुमान दवंडे, राहुल मुजमुले,मुमताज अन्सारी,सय्यद जुनेद,सय्यद तय्याब,पांडुरंग शेजूळ, 
कुलदीब बिनगे, शेख असेफ,
दरम्यान,यावेळी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे पद आधिकारी याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकारच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

-------
फोटोओळी:परतूर:परतूर मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारणीचा सत्कार करताना पत्रकार दिसत आहे.
------------------

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत