सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

येनोरा येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिर संपन्न..


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतुर तालुक्यातील मौजे येनोरा येथे ग्रामपंचायतच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिर घेण्यात आले.
सदरील शिबिरात 265 नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली. सदरील शिबिरात 32 मोतीबिंदू नेत्र रुग्णांना सरकारी दवाखाना आष्टी येथे दिनांक 29/1/2023 रोजी तपासणी करिता बोलवण्यात आले . मोतीबिंदू असलेल्या रुग्णावर दिनांक 8/02/2023 रोजी जालना येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येतील. सरकारी दवाखाना येथील डोळ्याचे डॉ. शिवाजी पोकळे यांनी नेत्र तपासणी केली सदरील शिबिर यशस्वी करण्यासाठी येणोरा येथील सरपंच सौ. कांचन उद्धव जोगदंड व ग्रामपंचायत उपसरपंच अरुणा तौर, इतर प्रकाश बोंबले, अंगदराव भुंबर, सर्जेराव घोडे,भारत भुंबर, बंडेराव भुंबर, सर्जेराव घोडे, लक्ष्मण भुंबर, इतर पांडुरंग नवल, एकनाथ भुंबर , मनोज भुम्बर, गौतम साळवे,माऊली साळवे, पिणू भुंबर ,नामदेव तौर, भागवत भुंबर, ज्ञानेश्वर तौर,व सर्व ग्रामपंचायतचे सदस्य व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत