सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन


परतूर  प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
   सामाजीक कार्यकर्ते ईजरान कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
  त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे,ईज्रान भाई कुरेशी, अर्जुन पाडेवार, गफार सौदागर, विष्णू मुजमुले, पञकार अजय देसाई, रशिद बागवान, मुमताज अन्सारी, शेख, शबीर,यांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहनवाज कुरेशी,मलीक कुरेशी, ईसरार खतीब, सलिम काजी,निसार भाई,शेख जलील ,अरबाज तांबोळी, जुनैद कुरेशी,अखिल बिल्डर,शेख गौस, शेख मोईन, सरफराज कायमखाणी, सिराज खतीब,सैयद नोमान,फरहान लाहमदी,शकील कुरेशी, शेख सोनु, शेख अशफाक, ईलियाज कुरेशी, रफीक कुरेशी, शेख फरहान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरफराज कायमखाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्जुन पाडेवार यांनी मानले.
-----------------------------
   या कास्को बॉल नाईट सर्कल स्पर्धा प्रथम पारितोषिक 11111 रुपये ईजरान कुरेशी यांच्यामार्फत तर व्दितीय पारितोषिक 7777 रुपये सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांच्यामार्फत देण्यात येणार आहे. याशिवाय इतरही अनेक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत