सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

रेल्वे उड्डान पूलाला चक्रवती सम्राट अशोक नाव देण्याकरिता निवेदन

*
   परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण 
   परतूर शहरातील महत्वाकांक्षी असलेला रेल्वे पूलाचे आज माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला
    या रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी परतुर येथील सम्राट अशोक मित्र मंडळ यांच्या वतीने आमदार बबनराव लोणीकर यांना एक निवेदन देण्यात आले की चक्रवती सम्राट अशोक यांनी काळात मध्ययुगीन काळात भारतात एक संघ ठेवून अखंड भारताचे नेतृत्व केलेले आहे अशा महान चक्रवती सम्राट अशोकाचे नाव रेल्वे उड्डाण पुलाला देण्यात यावे अशी मागणी या निवेदनात केलेली आहे
   या दि निवेदनावर सम्राट अशोक मित्र मंडळ यांचे अध्यक्ष संतोष हिवाळे सचिव प्रमोद राठोड यांच्यासह विष्णू काळे नाना डोने विजय यादव सतीश हिवाळे सतीश प्रधान आनंद प्रधान रवी हिवाळे प्रवीण प्रधान नरेंद्र कांबळे कृष्णा प्रधान विष्णू सांगळे कृष्णा ठाकर के संदीप दवंडे प्रवीण बंड राहुल हिवाळे विष्णू भालेकर बळीराम काळदाते रघु काकडे भगवान पितळे विकी हिवाळे केशव काकडे बाळू शेळके अनिल खंदारे योगेश वाघमारे मारुती तोत्रे बापूराव तायडे राजू खंदारे अनिल पाईकराव मुरली सोनखेडकर सुनील गायकवाड यांच्य स्वाक्षऱ्या आहेत

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत