सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतुर रेल्वे स्थानकात बेशुद्ध अवस्थेत आढळला अनोळखी इसम

परतूर /प्रतिनिधी कैलाश चव्हाण
     दिनांक 5 जानेवारी रोजी परतुर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर एक वर रेल्वे ब्रिज जवळ एक अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेला असल्याची माहिती रेल्वे स्टेशन मास्टर मीना यांनी रेल्वे पोलिसांना दिली त्यावेळी कर्तव्यावर असलेले रेल्वेचे असिस्टंट सब इंस्पेक्टर सूर्यकांत नाकसाकरे, श्रीलेले, पोलीस कॉन्स्टेबल राजेश उबाळे यांनी त्यांना ताबडतोब ग्रामीण रुग्णालय परतूर येथे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित करून मृतदेह शिवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला रेल्वे पोलीस ठाणे,औरंगाबाद येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येऊन गुन्हा संख्या 04/2023 कलम 174 नुसार कार्यवाही करण्यात आली पुढील तपास जीआरपीचे श्रीलेले हे करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत