सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

बिल काढण्यासाठी लाच घेताना जलसंधरण उपविभागिय अधिकार व क्लर्क रंगेहाथ पकडले

 प्रतिनीधी समाधान खरात
     दि 6 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथील महाराष्ट्र जलसंधारण वीभाग कार्यालय समोर जलसंधारण उपविभागीय अधिकारी रूषीकेश प्रल्हादराव देशमुख व क्लर्क भाऊसाहेब दादाराव गोरे यांना आठ लाख त्रेपन हजार दोनशे पन्नास रुपायाची लाच घेलना जालना लाच लूचपत अधिकारी यांनी रंगे हाथ पकडले
  सवीस्तर वृत असे की परभणी येथील चौडेश्वरी कंस्ट्रक्शन यांनी गवळी पिंपळी ता. सोनपेठ जी परभणी येथे व गोंवीदपूर ता पूर्णा येथे दोन कोल्हापूरी बंधारे बांधले ज्याचे बील अनुक्रमे १८००,००० रु तर दुसरे १,१९, ००,००० आसे एकूण १,३७,००, ००० कामाचे तीसरे बील काढण्याकरीता व्यवस्थापकीय संचालक सुनिल कुशीरे यांचे ७.५ टक्के प्रमाणे ८,०३,२५० रुपये स्वताः साठी ५०००० रुपये असे एकूण ८,५३,२५० रूपायची मागणी केली त्यांची लाच देण्याची इच्छा नव्हती त्यांनी लाचलूचत कार्यालय जालना यांना सांगितले व त्यांना घेताना महाराष्ट्र जलसंधारण कार्यालय समोर इनोव्हा गाडी क्रंMH 20 FG 5005 या गाडी मधे लाच घेताना पोलीस अधीक्षक औरंगाबाद संदिप आटोळे , अप्पर पोलीस अधीक्षक ओरंगाबाद विशाल खांबे पोलीस उप अधीक्षक जालना सुदाम पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार गजानन कांबळे, शिवाजी जमधडे, गजानन बुजाडे,प्रवीण खंदारे ला. प्र. वि.,जालना यांनी रंगे हाथ पकडून ही कारवाही केली

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत