सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वरफळवाडी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

 परतुर/( प्रतिनिधी)कैलाश चव्हाण
 महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढ दिवसा निमित्त आज वरफळवाडी येथे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या पुढाकाराने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये जि.प.शाळा वरफळवाडी
 शाळेमध्ये बाळासाहेबांची शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीने शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले तसेच गरजूना फळे देण्यात आले
   या प्रसंगी युवा सेना तालुका प्रमुख अविनाश कापसे यानी आपले विचार म्हणताना सांगितले की आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस आहे पुढे बोलताना ते म्हणाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विकासशील मुख्यमंत्री असून त्यांनी महाराष्ट्राच्या विकासावर भर दिलेला आहे भविष्यातही ते महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने घेऊन जाणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले
    याप्रसंगी अमोल सुरुंग ,सुधाकर बेरगुडे ,बाळू कापसे ,विजय कुमार गिरी, अनिल कुमार गिरी, विनायक मातने ,सोपान कातारे, दत्ता अंभुरे, दिनेश शेंडगे, विजय देवकर, सुरेश कापसे ,गणेश जाधव ,गणेश शिंदे, सुनील शिंदे ,सुभाष कदम ,सोपान शिंदे, गुलाब शेळके, बाबुराव ढवळे, कैलास बेरबगुडे, हरिभाऊ डीसले, मोकीन कदम, बाबुराव शिंदे, या सह शाळेचे शिक्षक कर्मचारी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत