सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूरकरांनी राम नवमी उत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी-सावता काळे


परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
 30 मार्च रोजी परतूर शहरात प्रभू श्री राम नमवी निम्मित विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येणार आहेत.
 सांय. ६ वाजता महादेव मंदीर मोंढा येथे भव्य महारतीचे आयोजन करण्यात आले असून परतूर शहरात प्रथमच भव्य ७ फुटी श्री राम यांची फायबर पासून बनवलेली मूर्ती तसेच लेजर लाईट अँड ढोल ताशा पथकाचे आकर्षण असणार आहे.
   30 मार्च रोजी राम नमवीच्या दिवशी सायंकाळी 4 वाजता छात्रपती संभाजी नगर उढाण पूल ते नारायण दादा पवार चौक भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे या मिरवणुकीत लेझिम पथक, भजनी मंडळ, इत्यादी विशेष आकर्षण असणार आहे.
तरी जास्तीत जास्त परतूरकरानी श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विश्व हिदू परिषदचे सावता काळे यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत