सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

नवीन वाद निर्माण होण्या पूर्वीच;प्रशासनाने उढ्ढाण पुलावरी झेंड काढले

परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण
परतूर तालुक्यातील आष्टी वलखेड घनसांवगी तालुक्यातील पारडगांव कंडारी आसे अनेक गांवाना नेहमीच रेल्वेगेट चा त्रास होत होता मतदार संघाला लोणीकर यांच्या माध्यमातून मंत्री पद मिळाले आणि या रेल्वे गेटवर लोणीकर यांनी उढाण पूला करीता प्रयन्त केले आणि उढाण पूल तयार झाला व नुकतेच आ.बबनराव लोणीकर याच्या हस्ते लोकार्पन सोहळा झाला व उढाण पूला वरून रहदारी सुरु झाली उढाण पूल याला वेगवेगळ्या महामनावाची नावे देण्याकरीता वीवीध निवेदन देण्यात आले हे इतक्या वरच न थांबता या पुलावर विविध रंगाचे झेंडे लावल्याने प्रशासनासमोर नवीनच प्रश्न निर्माण झाला होता. हया झेंड्या मुळे  भवीष्यात नवीनच वाद निर्माण होऊ नये म्हणून शेवटी नगरपालिका ,पोलीस,महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली व झेंडे हटवून पोलिसात गुन्हा दाखल झाला.
 या पुलावर वाहतूक सुरू झाल्याचा आनंद वाहनचालक घेत असतांनाच पुलावर विविध रंगाचे झेंडे ऐन रस्त्याच्या मध्यभागी रात्रीतून कोणतीही परवानगी न घेता लावण्याचे काम झाल्याने पुलावर या झेंड्याचा अडथळा निर्माण झाला होता. हे सर्व झेंडे लावण्याचे काम बुधवार व गुरुवारच्या रात्री दरम्यान झाले. गुरुवारी ही बाब वाहनचालकांच्या लक्षात आल्यानंतर अनेकांनी याची सूचना नगरपालिका,पोलीस महसूल प्रशासनाला दिल्याने गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास मोठ्या पोलीस फाट्या च्या उपस्थितीत हे सर्व झेंडे हटवण्यात आले.नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक रवी सुधाकर देशपांडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात परतूर पोलिसात कलम २८३ भादवी सह कलम ३,४ महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम,कलम ३ महाराष्ट्र प्रॉपर्टी डामेज ॲक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उप निरीक्षक कमलाकर अंभोरे करत आहेत.या कारवाईनंतर पोलिसांनी शहरात गस्त वाढवली असून पुलाजवळ सुद्धा अतिरिक्त पोलीस तैनात केले आहे

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत