सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

महिला ने सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे- डॉ नीता वानखेडे

जालना प्रतिनिधी समाधान खरात
     श्री क्षेत्र आजूबाई प्रेसिडेन्सी विज्ञान वाणिज्य कला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय आन्वा ता भोकरदन  जिल्हा जालना या ठिकाणी महिला दिन साजरा करण्यात आला  यावेळी प्राचार्य डॉक्टर नीता वानखेडे यांनी सांगितले की माता जिजाऊ माता रमाबाई माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रमाणे खंबीरपणे उभे राहून  शिक्षण घेऊन महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे आजच्या युगात फार गरजेचे असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले
     यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष तुषार गवळी, प्राचार्या श्रीमती डॉ नीता वानखेडे, रिता वानखेडे, खंडेलवाल सर, सपकाळ सर, देशमुख , वानखेडे सर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या उपस्थित होते यावेळी डॉ नीता वानखेडे यांनी महिला दिनाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत