सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर माहेश्वरी समाजाच्या तालुक़ा अध्यक्षपदी राजेंद्र पोरवाल तर शहर अध्यक्ष गोविंद झंवर

परतूर प्रतिनिधि कैलाश चव्हाण 
   परतूर माहेश्वरी समाजाच्या नूतन कार्यकारिणी ची निवड प्रक्रिया नुक़तीच पार पडली. यात परतूर तालुक़ा अध्यक्षपदी राजेंद्र पोरवाल यांची तर शहर अध्यक्ष गोविंद झंवर यांची सर्व सहमतीने बिनविरोध निवड करण्यात आली.
या सोबत तालुक़ा कार्यकारिणी वर उपाध्यक्ष - नंदकिशोर मंत्री , आष्टि सचिव - महेश लाहोटी, सहसचिव- रवी मुंदड़ा 
संगठन मंत्री - अजीत पोरवाल ,कोषाध्यक्ष - सत्यनारायण राठी , यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शहर कार्यकारिणी वर उपाध्यक्ष गणेश जेथलीया, सचिव- बालाजी चांडक ,सहसचिव - प्रशांत सोमानी, संगठन मंत्री- शिवप्रसाद मुंदड़ा, कोषाध्यक्ष- रवी सोमानी यांची निवड केली गेली. 
या प्रक्रियेत निवडनूक अधिकारी अखिल भारतीय माहेश्वरी सभेचे सदस्य ओमप्रकाश मंत्री हे होते. या बैठकित संजय दाड, शिवजी मामा दरगड, लक्ष्मीनारायण मानधना, प्रसाद झंवर, राजेश मंत्री , राधेश्याम मुंदड़ा, जगदीश झंवर श्याम सोनी ,यांची प्रमुख उपस्थिति होती.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत