सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

पत्रकारांसाठीही स्वतंत्र मतदार संघ द्या!विकासकुमार बागडी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


जालना प्रतिनिधी समाधान खरात 
    ज्याप्रमाणे शिक्षकांसाठी आणि पदवीधरांसाठी स्वतंत्र आमदार देण्यात आलेला आहे, त्याचप्रमाणे पत्रकारांसाठी देखील स्वतंत्र आमदार देण्यात यावा. पत्रकारांना देखील संरक्षणाची गरज असून त्यांना विमा, कर्ज योजना, घरकुल, शासकीय जाहिरात, मुलांचे शिक्षण, प्रवास सवलत, पेनशेन, भविष्य निर्वाह निधी, प्रलंबीत जाहिरात बील, अधिस्वीकृतीचा लाभ आदी अनेक शासकीय योजनांचा लाभ हवा असतो. परंतू तो त्यांना मिळत नाही
   तो त्यांना देखील मिळाला पाहिजे. आमदार- खासदार, मंत्री व शासकीय अधिकारी हे पत्रकारांच्या समस्यांची कधीच दखल घेत नाहीत. म्हणूनच पत्रकारांसाठी देखील शिक्षक आणि पदवीधरांप्रमाणे स्वतंत्र आमदार पाहिजे. जेणे करुन त्यांच्या समस्या मार्गी लागतील. महाराष्ट्रात सहा प्रशासकीय विभाग असून प्रत्येक विभागाला स्वतंत्र आमदार देण्यात यावा.
तरी उपरोक्त समस्यांची मुख्यमंत्र्यांनी जातीने सोडवणूक करावी, अशी विनंतीही श्री. बागडी यांनी निवेदनाच्या शेवटी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत