सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर नगरपालिकेतर्फे सफाई कामगारांचा सत्कार*

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
   परतूर नगरपालिकेतर्फे १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त कामगारांचा नगरपालिकेतर्फ सत्कार करण्यात आला.यात नगरपालिकेतील सफाई कामगार कैलास हिवाळे व संजय काळे ब-याच वर्षापासून इमाने इतबारे सफाईची कामे केल्याबद्दल त्यांचा सत्कार शालश्रीफळ व प्रत्येकी रु. ३१०१बक्षीस नगर पालीका प्रशासक तथा परतूर उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्या हस्ते देउन सफाई कामगारांचा सत्कार सन्मान कामगार दिनाचेऔचित्य साधत नगर पालीकेत करण्यात आला.
   यावेळी मुख्याधिकारी गंगाधर पेंटे ,बी एस चव्हाण , कार्यालयीन अधीक्षक चाऊस ,रामचंद्र पानवाले ,रवी देशपांडे, नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष रहेमु कुरेशी ,चंद्रकांत खनपटे, दरोगा खंदारे ,शिवदास चव्हाण व आदी परतूर नगर परिषदचे कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत