सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाची माजी विद्यार्थ्यांना हाक

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
   येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ परतुर संचलित लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. भगवान दिरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थ्यांचे सवांद मेळाव्याचे आयोजन दिनांक 8 मे 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता करण्यात आलेले आहे. महाविद्यालयाच्या विकासात माजी विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे असंख्य माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या महाविद्यालयाचा ठसा उमटत आहे. न्यायाधिश, प्राध्यापक , शिक्षक , वकिल , अधिकारी, प्रगतशिल शेतकरी उद्योजक, पत्रकार , राजकिय नेते, BOS आणि विद्यापीठ स्तरावर chairmen आदि पदावर कार्यरत आहेत. यात महाविद्यालयाचा अभिमान आहे. बदलत्या काळात महाविद्यालयाच्या विकासात आणखी भर घालण्यासाठी माजी विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाने माजी विद्यार्थ्यांना हाक दिलेली आहे. या हाकेला माजी विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद द्यावा. या माजी विद्यार्थीच्या सवांद मेळाव्यासाठी अनेक माजी विद्यार्थी , विद्यार्थिनी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत खंदारे सर यांनी प्रसार माध्यमांना दिली. जय जवान जय किसान विध्यार्थी असोसिएसन परतूर चे अध्यक्ष डॉ केशव बरकुले व सचिव प्रा अमोल काळे यांनी माजी विद्यार्थ्यांना उपस्थितही राहण्याची विनंती केली आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत