सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

कुरुक्षेत्र महादेव मंदिर येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न ,६६ रक्तदात्यांनी रक्तदान केले



परतूर  प्रतिनिधी  कैलाश चव्हाण 
   प्राचीन कुरुक्षेत्र महादेव मंदिर येथे दि. ८ मे रोजी सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ६६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीराचे अखिल भारतीय अग्रवाल संमेलन, प्रल्हादपूर स्वच्छता प्रेमी, कुरुक्षेत्र महादेव भक्त मंडळ व जनकल्याण रक्तकेंद्र जालना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्राचीन काळापासून कुरुक्षेत्र महादेव मंदिर अस्तित्वात आहे या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी असते. 
   या अनुषंगाने अखिल भारतीय अग्रवाल संमेलन, प्रल्हादपूर स्वच्छता प्रेमी, कुरुक्षेत्र महादेव भक्त मंडळ व जन्मकल्याण रक्तकेंद्र जालना यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी उत्साहात रक्तदान केले. तसेच या रक्तदान शिबिरात भाविकांनी आपले रक्तगट तपासून घेतले. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय अग्रवाल संमेलन, प्रल्हादपूर स्वच्छता प्रेमी, कुरुक्षेत्र महादेव भक्त मंडळ व जनकल्याण रक्त केंद्र जालना व भाविकांनी यांनी सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत