सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

बीड ते चौंडी बस सेवा सुरु समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा- प्रकाश सोनसळे

 प्रतिनिधि समाधान खरात 
बीड ते चौंडी बस सेवा सुरू झाली आहे या बस सेवेचे आज बीड स्थानकामध्ये पुष्पहार व नारळ फोडून पिवळा झेंडा दाखवून या बसचे उद्घाटन आज करण्यात आले.
  ही बस सकाळी 09.30 च्या दरम्यान बीड स्थानकामध्ये लागणार आहे व ही बस 09.45 च्या सुमारास चौंडी कडे निघणार आहे .
 बीड चौंडी बससेवचे उद्घाटन करताना धनगर समाज महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रकाश  सोनसळे, धनगर समाज बीड जिल्हा प्रमुख भारत गाडे ,महानवर सर, दातीर सर, सानप साहेब, सुखदेव मंडलीक,लक्ष्मण बेवले, मुक्ताराम शेळके,शरद तायडे, भगवान मेंद,जय खरात, करण भोंडवे ,विशाल तांबे, डफाळ नवनाथ,गहिनीनाथ खरात,डिंगाबर खरात,नवनाथ लांडे,जयराज भोजने, आदींच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत