सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल परतुर येथे बाल दिंडी सोहळा उत्साहात संपन्न.

परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण
शहरातील देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलयेथे आषाढी एकादशीनिमित्त पूर्वसंध्येला बाल दिंडी कार्यक्रम घेण्यात आला. वरील कार्यक्रमाची सुरुवात पालखीच्या पूजनाने करण्यात आले पालखीचे पूजन संस्थेचे अध्यक्ष  दिनकरराव चव्हाण संचालक संतोष चव्हाण, सुबोध  चव्हाण ,सचिन चव्हाण सौ . भाग्यश्री चव्हाण, हर्षदा चव्हाण, प्राचार्य गजानन कास्तोडे यांच्या हस्ते करण्यात आले . 
सदरील दिंडी मध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, वारकरी
अशा विविध वेषभूषा साकारल्या,शाळेपासून विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली. डोक्यावर तुळस, हातात टाळ,गळ्यात तुळशीची माळ व ग्यानबा
तुकारामच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. चिमुकल्यांनी दिंडीत अभंग, भजने, भारुडे म्हणत तर मुलींनी
फुगड्या खेळत सहभाग घेतला. सदरील दिंडी शाळेच्या प्रांगणात आल्यानंतर विद्यार्थ्यांना वारीतील रिंगण सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव यावा याकरिता रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदरील रिंगण सोहळा विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पार पाडला
       याप्रसंगी विद्यार्थ्यांसह शाळेचे प्राचार्य गजानन कास्तोड, शिनगारे मॅडम, लहाने मॅडम, नयना मॅडम, बेडेकर मॅडम, काळे मॅडम, दसमले मॅडम, पोरवाल मॅडम प्रा. प्रदीप चव्हाण, प्रदीप साळवे, बाळासाहेब कदम ,नाना डोने, महादेव नळगे,राजेश कार्लेकर यांच्यासह पालक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत