सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

समर्थ विद्यालयाचे कुस्ती स्पर्धत यश.



परतुर. प्रतिनीधी कैलाश चव्हाण 
तालुकास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेत कुस्ती या खेळ प्रकारात पाटोदा येथील श्री समर्थ माध्यमिक विदयालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
आज दि. पाच सप्टेबर रोजी तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धे अंतर्गत परतुर येथे कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यत आले होते. या स्पर्धेत चौदा आणि सतरा वर्ष वयोगटात विद्यालयाचे विद्यार्थी  युवराज शिंदे शेख रेहान या खेळाडुंनी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करीत अजिंक्यपद पटकावले. 
या दोन ही खेळाडुंची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
यशस्वी खेळाडुंचे संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री व विद्यमान आमदार मा.बबनरावजी लोणीकर साहेब , ऊपाध्यक्ष तुळशिदासजी खवल, मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर , क्रिडा शिक्षक भास्कर कुळकर्णी , सर्व शिक्षक बांधव , पालक श्री संभाजी शिंदे , शेख लाला व गावकर्यांनी अभिनंदन करुन कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत