सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

शत्रुघ्न कणसे यांची भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्षपदी निवड


परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती आष्टीचे सभापती शत्रुघ्न कणसे यांची भाजपा तालुकाध्यक्ष पद्दी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल भैया लोणीकर यांच्या उपस्थितीत वाटुर तालुका परतुर येथे संपन्न झालेल्या बैठकीत नीवड  करण्यात आली
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की गेल्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शत्रुघन कणसे यांनी केलेले काम अतिशय चांगले असून पक्ष वाढीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न अतिशय कौतुकास्पद असल्याचे यावेळी बोलताना लोणीकर यांनी सांगितले
पुढे बोलताना ते म्हणाले की, संघटनेचे काम करत असताना कणसे यांनी केलेले काम अतिशय उत्तम असून तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे
तालुकाध्यक्ष म्हणून निश्चितच शत्रुघन कणसे कम करतील अशी अपेक्षा यावेळी आमदार लोणीकर यांनी व्यक्त केले

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत