सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

2020 मधील गुन्ह्या च्या आरोपीस राजस्थान येथुन अटक

जालना प्रतिनिधी समाधान खरात
    सन 2020 मध्ये दाखल असलेल्या गुन्हाचे तपासात निष्पन्न झालेल्या आरोपीस अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो जालनाचे पथकाने राजस्थान येथे जाऊन पकडले आहे. 
अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो जालना यांचेकडुन उघड चौकशी करून खालील नमुद आरोपीतांनी माहे 07/2011 ते 12/2013 या कालावधीत पंचायत समिती घनसावंगी जि जालना अंतर्गत कुं.पिंपळगाव शिवारातील मग्रारोहयो अंतर्गत विहीरींचे कामासंबंधी संगनमत करून खोटे व कपटाने प्रत्यक्षात न केलेल्या कामाची नोंद हजेरी पुस्तकात घेऊन बनावट व खोटी पुस्तके तयार करून वेळोवेळी रकमा मंजुर करुन घेतली वा शासनाचे 9,65,952 रूपयांचे नुकसान करून स्वत:चा व इतरांचा फायदा करून घेतला या वरुन दि. 21.07.2020 रोजी पोलीस ठाणे घनसावंगी जि.जालना गु र नं 271/2020 कलम 13(1)(क), सह 13(2) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 सह कलम 420, 467, 468, 471, 114,109, 201, 34 IPC प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात 
आरोपी नामे 
1. शे.शकील मो खलील, तत्कालीन शाखा अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, पं स घनसावंगी 
2. धोंडीभाऊ भाऊराम काळे, तत्कालीन ग्रामसेवक कुं.पिंपळगाव 
3. अंशीराम भिमराव कंटुले, तत्कालीन सरपंच 
4. पुंडलिक लक्ष्मण रोकडे, रोजगार सेवक.
यांना अटक करून तपास करण्यात आलेल होता. 
सदर गुन्ह्यात लाभार्थी यांचे विहीरींचे खोदकाम न करता ब्लास्टींग न करता, ब्लास्टींग केल्याचे दाखवून आरोपी नामे हिरालाल भैरूलाल जाट रा. धुमडास ता.जि. भिलवाडा याचे खात्यावर पैसे पाठवुन त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. 
  संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो छत्रपती संभाजीनगर आणि  किरण बिडवे, पोलीस उप अधीक्षक अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो जालना यांचे मार्गदर्शनाखाली  शंकर मुटेकर, पोलीस निरीक्षक यांनी पथकातील पोना/गजानन खरात, पोकाॅ/गजानन कांबळे यांचेसह राजस्थान येथे जाऊन गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या आरोपीचा शोध घेवुन त्यास गुन्ह्याचे तपासकामी अटक केले आहे. 
अटक केलेल्या आरोपीस आज दि 29.12.2023 रोजी मा. विशेष न्यायालय अंबड हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपीस दि. 02.01.2024 रोजी पावतो 5 दिवस PCR दिलेला आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत