सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

शिकलकरी मोहल्यातून तलवार चाकू जप्त.परतूर पोलिसांचे शहरात कोंबींग ऑपरेशन


परतूर – प्रतिंनिधी कैलाश चव्हाण 
येथील शिकलकरी मोहल्ल्यात पोलिसांनी कोंबींग ऑपरेशन राबवून दोघा जणांच्या घरातून पोलिसांनी तलवारी आणि चाकू जप्त त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी कोंबींग ऑपरेशन दरम्यान सोन्यासिंग प्रेमसिंग टाक, हरदीपसिंग हरजितसिंग जुनी दोन्ही रा. शिकलकरी मोहला परतूर यांचे घरात तलवार आणि चाकू मिळून आले आहे. या त्यांचेवर भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. 
   सदरची कारवाई पोलिस अधीक्षक शैलेस बलकवडे , उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश बुधवंत यांच्या मार्गर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम.टी. सुरवसे, पोऊपनि यू.बी.चव्हाण, पोऊपनि विठ्ठल केंद्रे, पोना अशोक गाढवे, पोका ज्ञानेश्वर वाघ, पोका अच्युत चव्हाण, पोका शामूवेल गायकवाड, पोका दशरथ गोपनवाड, पोका दिपक आढे, पोका संगीता मांडे, होमगार्ड कपिल आखाडे, अर्जुन बोंडगे यांनी कारवाई केली.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत