सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष परतूर मंठा विधानसभा कक्ष प्रमुखपदी कैलास चव्हाण यांची नियुक्ती



परतूर प्रतिनिधी 


राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब, मा. खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना विभागीय नेते अर्जुन भाऊ खोतकर सूचनेनुसार बंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या परतूर मंठा विधानसभा कक्ष प्रमुख या पदासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांच्या शिफारस नुसार कैलास चव्हाण ची निवड करण्यात येत आहे.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आपण गोर-गरीब, गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांत राखीव खाटा उपलब्ध करुन देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना च) शस्त्रक्रिया मोफत करणे संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर रहावे.

गंभीर-महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थ सहाय्य व्हावे याकरीता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री. सिध्दिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट यांसारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी मिप्रयत्न शिल राहील या निवडबद्दल सर्व शिवसैनिक कडून पुढील वाटचाळीस शुभेच्या देण्यात आल्या मंगेशजी चिवटे विशेष कार्यकारी अधिकारी,
रामहरी भिमराव राऊत
कक्षप्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष (महाराष्ट्र राज्य)ज्ञानेश्वर धुळगंडे सहकक्षप्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष (महाराष्ट्र राज्य)शिवसेना विभागीय नेते अर्जुन भाऊ खोतकर,शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल,शिवसेना तालुका प्रमुख अमोल सुरुंग ,युवा सेना तालुका प्रमुख अविनाश कापसे,उपतालुकाप्रमुख सोपान कातारे, उपतालुकाप्रमूख नितीन राठोड, विभागप्रमुख गजानन आकत, विभाग प्रमुख अंगद खरात, महादेव वीर अल्पसंख्यांक प्रमुख शेख खाजा शेख चाँद, दलित आघाडी राहुल भदर्गे शिवसेना उप शहर प्रमुख कैलास पुरी,शिवाजी तरवटे ,बाबासाहेब चीखले,गिरी महाराज,शहर प्रमुख दीपक हिवाळे,कैलास ढवळे ,मिथुन चव्हाण,सरपंच शेडगे,यांची उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत