सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

यश माध्यमिक विद्यालय व यश प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी.

परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण
 आज दि. 13 जानेवारी 2024 शनिवार रोजी यश प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदने ने करण्यात आली.कु.नेहा बिडवे, कु. संस्कृती , कु.सुनंदा दांगट आणि कु. वैष्णवी यांच्या आवाजातील जिजाऊ वंदना ऐकूण सर्वजण मंत्रमुग्ध झाले .
   यावेळी अनेक विद्यार्थी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या वेशभुषा धारण करून शाळेत दाखल झाले. 
  या कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्राचार्य शामीर शेख हे अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून विलास गोरे , दिव्या तांगडे ,राधिका आकात उपस्थित होत्या.
    प्रारंभी मांसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 
       यानंतर कु.काव्या सोळंके, आरुषी बर्डे, स्वानंदी आकात ,राजवीर सोळंके व दिव्यांका सुर्यवंशी,आरुषी लाटे, आरुषी बर्डे, समृद्धी होंडे व साक्षी सोनटक्के अशा अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली, तसेच स्वराली आकात व भक्ती देशमुख यांनी उन्हाळा आणि पावसाळा हे जिजामातेचे गीत गाऊन सर्वांची मने जिंकली. 

दरम्यान प्रशालेच्या वतीने वेशभूषेतील विदयार्थ्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले.

  प्रशालेचे शिक्षक संतोष घरडे , बळीराम भले यांनी युगपुरुष विवेकानंद यांच्या विषयी तर विष्णू कुरधने, भावना पाटील यांनी जिजामाता कोण होत्या हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच राधिका आकात यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
 आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य शामीर शेख यांनी जिजामातांनी कशाप्रकारे प्रतिकूल परिस्थितीत शिवरायांना घडवले व स्वामी विवेकानंद युवकांचे प्रेरणास्थान कसे होते हे समजावून सांगितले.
  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयराम चव्हाण यांनी तर आभार सीमा पवार यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत