सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

बीड येथे तलाठी परीक्षेमध्ये पात्र विद्यार्थ्यांचे धनगर समाज संघटनाच्या वतीने सत्कार

बीड प्रतिनिधी 
(बीड) धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य बीड जिल्हा यांच्यावतीने आज बीड येथे तलाठी परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवल्याबद्दल सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.     
  यामध्ये तलाठी यापदावर निवड झाल्याबद्दल कोमलताई भोंडवे पिठी ता. पाटोदा जि. बीड, पांडुरंग निर्मळ खुंडरस ता. जि. बीड, मनेश चौरे निपानी जळका ता. गेवराई जि.बीड यांचा सन्मान करण्यात आला.
    धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष प्रकाश  सोनसळे यांनी धनगर समाजातील तलाठी पदावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्काराचे बीड येथे आयोजन केले होते.यावेळी नारायणजी भोंडवे जिल्हाध्यक्ष बीड, अमोलजी भोंडवे तालुकाध्यक्ष पाटोदा.सूर्यकांत कोकाटे, विठ्ठल कोकाटे, सुदर्शन दादा भोंडवे,प्रा.देवकते सर,कैलास जी पांढरे, दिगंबर जी चादर,परशुराम सापणकर,माऊली गुरव,गोकुळ कंठाळे,शिशिर ढाकणे,गणेश नाटकर,सुखदेव खंडागळे,योगेश घोडके,कोकाटे  ,भोंडवे  आदींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत