सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

एनएमएमएस शिष्यवृत्ती पात्र परीक्षेत कन्या विद्यालयाचे यश


परतूर – प्रतिनिधी  कैलाश चव्हाण 

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद यांच्याकडून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना पात्रतेसाठी घेण्यात येणार्‍या एनएमएमएस परीक्षेत परतूर येथील लाल बहादुर शास्त्री कन्या विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन आहे.

एनएमएमएस परीक्षा ही राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा आहे. शिष्यवृत्ती परीक्षा पात्र परीक्षेत गायत्री कणसे, गायत्री साबळे, कोमल सोनटक्के या तीन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या आहेत. त्यांना दरवर्षी बारा हजार रुपये प्रती विद्यार्थ्यांना चार वर्ष शिष्यवृत्ती मिळणार आहे.  

या एनएमएमएस परीक्षेत कन्या विद्यालयाचे गायत्री कणसे, गायत्री साबळे, कोमल सोनटक्के, वैष्णवी शेंडगे, या चार विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.

या यशाबद्दल मुख्याध्यापक संजय जाधव, शिक्षक शाम कबाडी, कैलास खंदारे,रामराव घुगे,योगेश बरीदे, अनिल काळे.रामप्रसाद नवल, सचिन कांगने, बळीराम नवल, सुरेश मसलकर, श्रीमती वृंदा डक,आणि प्रल्हाद कणसे, उद्धव कणसे, पुंजाराम कणसे,संपत टाकले, प्रशांत बेरगुडे, शामराव चव्हाण, अंकुश कणसे, जीवाजी शिवतारे, संतोष रेपे,आदींनी कौतुक केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत