सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीची कार्यकारणी जाहीर.अध्यक्ष पदी विजय यादव तर सचिव पदी शुभम कठोरे


  परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
   परतुर सार्वजनिक शिवजयंती जन्मोत्सव 2024 ची येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अध्यक्ष पदी विजय यादव तर सचिव पदी शुभम कठोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष अतुल हजारे व विष्णू काळे, कार्याध्यक्ष प्रमेश्वर डुकरे, सहसचिव पदी गणेश माने, कोषाध्यक्ष राहुल कदम,
संघटक दत्ता सुरुग, यांची निवड करण्यात आली. तर           सल्लागार
समितीत प्रकाश चव्हाण, नामदेव धुमाळ, संतोष हिवाळे, पांडुरंग नवल, अशोक तनपुरे, महेश नळगे, सचिन खरात, कृष्णा आरगडे, बाबुराव हिवाळे, बाळु चव्हाण, कृष्णा सोळंके, शाम तेलगड, रामजी सोंळके, गजानन राजबिंडे, भाऊसाहेब मुके, संपत टकले, सिद्धेश्वर लहाने, दिपक कदम, अविनाश शहाने, बाबाजी गाडगे, विष्णु मचाले, विकास बोडके, लक्ष्मण बिल्हारे, हनुमान दवंडे, शुभम ठाकुर, विठ्ठल सोनपावले, सुनील गायकवाड, सह आदी शिवप्रेमी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत