सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

महाराजे मल्हारराव होळकर यांचे विचार आत्मसात करून समाज बांधवाने पुढे यावे- प्रकाश सोनसळे (अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य)

बीड प्रतीनिधी
 बीड येथील नामलगाव फाटा या ठिकाणी राजे मल्हारराव होळकर यांची 331 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
मल्हारराव होळकर यांचा इतिहास जागा करण्यासाठी धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुढाकार घेऊन युवकांना प्रेरणा मिळेल असे काम मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज नामलगाव फाटा व घोसापुरी या गावांमध्ये मल्हारराव होळकर यांचा इतिहास जागा करण्यासाठी या गावातील युवकांनी पुढे येऊन पुढाकार घेतला.
    मल्हारराव होळकरांचा इतिहास मोठा आहे हा इतिहास आपण सर्वांनी जागृत केला पाहिजे व गावोगावी मल्हारराव होळकर यांचे विचार आपण पोहोचले पाहिजे असे या ठिकाणी बोलताना मा.प्रकाश  सोनसळे अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांनी समाज बांधवांशी बोलताना सांगितले.
  बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मल्हारराव होळकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.
  या वेळी उपस्थित धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष. प्रकाश  सोनसळे, अमोल भोंडवे युवक तालुकाध्यक्ष धनगर समाज पाटोदा, घोसापुरी चे दबंग सरपंच फारूख भैय्या पटेल व उपसरपंच सुभाष जाधव, घोसापुरी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र माळी. सुरेश वैद्य (ग्रा .पं. मेंबर).
जिल्हा संघटक अध्यक्ष सोमनाथ कुदवन. बीड तालुका युवक अध्यक्ष अंकुश वैद्य. बीड तालुका सरचिटणीस दत्ता काळे. बीड तालुका सचिव गौरव वैद्य. रतन वैद्य, श्रीमंत वैद्य, परमेश्वर वैद्य, हनुमंत वैद्य, जालिंदर नेंगुळे,बाळू मुळे, समाधान मासाळ,तानाजी वैद्य, विजय घोंगडे, संदीप वैद्य, कल्याण वैद्य, जयराम गुरव, महेंद्र शिंदे, अविनाश वैद्य,वैभव वैद्य, अभिषेक नेंगुळे,ओम मुळे, अशोक यादव, बाळासाहेब प्रभाळे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत