सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

प्रा डॉ शाम जवळेकर यांना यंदाचा समाजरत्न पुरस्कार जाहीर

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
नाशिक येथे समाजसेवी संस्था जे जे फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक, क्रीडा आदी कार्यामध्ये विशेष योगदान,कार्य करत असणाऱ्या संस्था,व्यक्तीना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
यंदाच्या सामाजिक कार्यात सदैव तत्परतेने सहभाग असणारी मराठवाडा विभाग जालना जिल्ह्यामधील सेवा भावी संस्था केसरिया बहुउद्देशीय सेवा भावी संस्था परतूर जि जालना व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा डॉ शाम जवळेकर यांच्या कार्याची दखल घेत पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यासह प्रोत्साहन पर पुरस्काराचे स्वरूप रुपये 11000/- शाल,श्रीफळ सन्मानचिन्ह असे असेल. लवकरच संस्थेचा वतीने सन्मान सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित साजरा केला जाणार असल्याची माहिती घोषणा जे जे फाऊंडेशन नाशिक चे अध्यक्ष श्री जितेंद्र जोशी यांनी केली. 
या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत