सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

डॉ इशा विष्णू कदम हिया सत्कार

   परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
  येथील शिक्षक विष्णूपंत कदम यांची मुलगी डॉ इशा ही संभाजीनगर येथे MBBS मध्ये गेल्या चार वर्षा पासून शिक्षण घेत आहे नुकतेच आता आलेल्या निकाला मधे विष्णूपंत कदम यांची कन्या MBBS च्या अतीम वर्षात उत्तर्णी झाली आहे 
    दि.1 एप्रील रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद परतुर च्या वतीने डॉ इशा विष्णुपंत कदम MBBS उत्तीर्ण झाल्याबद्दल वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर जी नवल परतुर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप मगर विष्णुपंत कदम सूर्यकांत जी निर्वळ श्री रामेश्वर दिरंगे आदींची उपस्थिती होती
   या सत्कारा नंतर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद परतुरचे तालूकाध्यक्ष दिलीप मगर सर यांनी शुभेच्छा देतांना सांगीतले की अमचे सहकरी शिक्षक विष्णूपंत कदम यांच्या मुलीने MBBS परीक्षेत यश मिळवून कदम परिवाची मान उंचावली आहे व तीने या पुढे MD ची शिक्षण घेऊन परतूरकरांची सेवा करावी आशी अपेक्षा डॉ इशा कदम कडून केली

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत