सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद परतूर च्या वतीने गटवीकास अधीकाऱ्यांना निवेदन

 परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण
  येथील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद च्या वतीने दि. 18 एप्रील रोजी वीवीध मागण्याचे एक निवेदन देण्यात आले 
    शिक्षकांचे आनेक देयक बाकी असून त्या मधे शिक्षकांचे वैद्यकीय देयक व , थकीत देयक , आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त देयक बाकी असल्या मुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद परतूर चे तालूकाध्यक्ष दिलीप मगर यांच्या नेतृत्वखाली गटवीकास अधिकारी कार्यालयात एक निवेदन दिले दिलेल्या निवेदनावर कल्याण बागल पाटील,विष्णू कदम,विशाल ढवळकर,ए. एच.देशमुख,मोरे बी.आर.,बी.बी.आन्सारी,शे.ताहेर म.जफर, तोटे,पाईकराव, आढे,रामेश्वर हातकडे,कैलाश गाडगे,नदिम अन्सारी,म.इक्कबाल,भारसाकळे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत