सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

श्री समर्थ विद्यालयास वर्ग 10 वी चे पुस्तक संच भेट

परतूर प्रतीनिधी  कैलाश चव्हाण 
          परतूर तालुक्यातील पाटोदा माव येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना  सिटी हॉस्पिटलचे संचालक प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ.सत्यानंद कराड व प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ संध्याताई कराड यांनी पुस्तकांचे संच भेट दिले.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना पुस्तकांचे संच वाटप करण्यात आले.
 या विषयी  डॉ.कराड यांनी सांगितले की ग्रामीण भागामध्ये असे अनेक विद्यार्थी असतात की ते केवळ पुस्तकांचे संच विकत घेऊ शकत नाहीत त्यामुळे इच्छा असूनही अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात असे होऊ नये म्हणून समाजातील अनेक दानसुर व्यक्तीने पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे.
      यावेळी परतुर येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.संध्याताई कराड , अमित लॅबोरेटरीचे संचालक अंगद नवल ,पाराजी रोकडे,सी.एन.खवल , पांडुरंग डवरे यांची उपस्थिती होती.
     या वेळी शाळेच्या वतीने डॉक्टर दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत