सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर येथील अदिवाशी अश्रम शाळेत रक्षा बंधन सण उत्साहात साजरा

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
 परतूर येथील अनु-आदिवासी आश्रम शाळा येथे (वर्ष 8 वे ) दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रक्षाबंधनचा सण उत्साहात साजरा करण्यात आला 
सौ.राजश्रीताई शिवहरी डोळे या दरवर्षी अनु-आदिवासी आश्रम शाळा परतूर येथे मुलांना राखी बांधत आहे.
 या सणाला भारतता फार महत्व आहे इतिहासात याचे आनेक दाखले बघायला मिळतात हा एक धागा नसून भाऊ बहिण्याचा अतूट प्रेमाची साक्ष हा सण देतो भारतीय संस्कुतीत  रक्षाबंधनाचा सण महत्त्वाचा आहे. भावा-बहिणीचे अतूट नाते दर्शवणारा हा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुसाठी प्रार्थना करते. तसेच भाऊही बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.
राजश्रीताईला सख्खा भाऊ नसल्या कारणाने त्या मागील 8 वर्षा पासून  आदिवासी मुलांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करत आहे. 
आज  रक्षाबंधणाच्या दिवशी त्यांनी 250 ते 300 भावासोबत हा सण  साजरा केला 

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत