सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये रक्षा बंधन उत्साहात


परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
  दि 19 ऑगस्ट वार सोमवार रोजी देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी येणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा .या सणाला बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्याविषयी प्रेम व कृतज्ञता व्यक्त करते. याचेच औचित्य साधून देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल मधील इयत्ता नर्सरी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थिनींनी आपल्या भावांना राखी बांधून हा सण साजरा केला. 
           यावेळी शाळेचे संचालक सुबोध  चव्हाण, शाळेच्या संचालिका श्रीमती भाग्यश्री चव्हाण, प्राचार्य जयकुमार तीमोथी, सहशिक्षक  गजानन कुकडे,  रमेश कदम, शाहीर शेख, श्रीमती वंदना ककरीये, श्रीमती स्वाती , काळे, मनीषा लहाने, शिबा,  काजी, श्वेता पाठक, निकिता कदम, अश्विनी डोंबाळे, त्रिवेणी गिरी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत