सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे तरुणांचे आदर्श हे महापुरुष असावे-सत्यपाल महाराज

तळणी ( प्रतिनिधी ) रवी पाटील 
  तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे तरुणांचे आदर्श हे ज्ञानोबा, तुकोबा, छञपती शिवाजी महाराज , डॉ बाबासाहेब आंबेडकर असले . पाहीजे यांच्या विचाराची खरच गरज आहे मनुष्याच्या आयुष्यात संतसग असने गरजेचे आहे  . आजच्या परीस्थीतीत तरूणांची व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात आहे , फुले शाहुच्या या महाराष्ट्रात हे शोभणीय नाही असे प्रतिपादन सत्यपाल महाराज यानी तळणी येथे केले राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष्य ज्ञानेश्वर माऊली याच्या वाढदिवसाच्या निमित्याने एक दिवसीय प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते 
समाजात आज  मोठया प्रमाणात अधं श्रध्देला खतपाणी घातल्या जात असल्याने . आजही समाज आसामाजीक तत्वाच्या विचाराचा बळी पडत आहे जगदगुरु तुकाराम महाराजांचा गाथा हा परीवर्तनासाठीच आहे ज्ञानोबा तुकोबानी  त्याच्या काळात सुध्दा अधंश्रध्देला त्याच्या अभंगाच्या वाड्मयातून विषद केले आहे मनुष्याच्या आयुष्यात धार्मिकता असणे खूप गरजेचे आहे तितकीच वैज्ञानीकता स्वीकारणे सुध्दा तितकेच गरजेचे आहे 

आज काल महीला सक्षमीकरणावर खूप बोलल्या जाते पंरतू त्याना खरोखर स्वांतत्र्य आहे का याचा विचार समाजाने करने गरजेचे आहे आजच्या विज्ञान युगात महीलांना पूर्ण स्वातत्र्य मिळने गरजेचे आहे तरच सपूर्ण कुंटूबांचा सर्वागीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही केवळ शिक्षण या क्षेञात प्राविण्य .मिळवून त्या थाबल्या नाहीत . प्रत्येक जबाबदारी स्त्रीयांनी पार पाडल्या आहेत आजच्या परिस्थीतीत स्त्रीयांवर होणारे अत्याचार हे विकसीत भारताला शोभणारे नाहीत 



संत तूकडोजी महाराज संत गाडगेबाबा महात्मा फुले यानी शिक्षणाचे फायदे त्या काळात सुध्दा त्यानी विषद केले आहे .समाजाने शिक्षीत व्हावे यासाठीचा मोठा संघर्ष या संतांनी केला म्हणूनच आपल्याला आज शिक्षणात स्वांतत्र्य व सुविधा आहे त्याचा उपयोग तरुणांनी घेने गरजेचे आहे तरूण हा देशाच्या कामी आला पाहीजे हे जरी खरी असले तरी तो देशीच्या  आहारी गेला आहे

महाराष्ट्रासह सपूर्ण देशात स्त्रीभ्रूण हत्या. बलात्कार या घटना घडत आहेत या घटना मनाला   वेदनादायक आहेत मुंलीना चागले संस्काऱ देने गरजेचे आहे मोबाईलचा . अनावश्यक वापर हा तरुण मुलीसांठी व तरुणासांठी घातक असल्याचे प्रतिपादन प्रबोधनकार सत्यपाल महाराज यानी केले या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील हजारो नागरीकांची उपस्थीती होती

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत