सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रेमानंद मगरे यांची राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते नियुक्ती

जालना प्रतीनिधी समाधान खरात
   जालना येथील प्रेमानंद मत्ताजी मगरे यांची रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सदरील नियुक्ती ही राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते निुयक्तीपत्र देऊन करण्यात आलीय.
प्रेमानंद मगरे यांनी गेल्या अनेक वर्षापासून डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत भारतीय बौध्द महासभेचं काम केलं आहे. त्यामुळे डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी जालना येथील प्रेमानंद मगरे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी निवड केली. यावेळी डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी मगरे यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीस सुभेच्छा दिल्या. 
  यावेळी महाराष्ट्र  प्रदेशअध्यक्ष दिनेश हनुमंते, राज्य सचिव वैभव धबडगे, राज्य उपाध्यक्ष सिध्दार्थ गायकवाड, दादाराव लहाने,बालु बोर्डे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. या निवडीबद्दल दादाराव लहाने, बालु बोर्डे, आनंद म्हस्के, दिपक आढाव,दिपक हिवाळे, सुनिल जाधव, राजेंद्र पवार,संजय वेव्हल, अनिरूध्द ढिल्पे, भगवान कांबळे, सुभाष आढाव,गौतम मगरे,मिलींद रगडे, यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत