सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजप, काँग्रेस आय, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला



 परतुर/( प्रतिनिधी) कैलाश चव्हाण
  तालुक्यातील आसनगाव येथील भारतीय जनता पार्टी,काँग्रेस आय,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, व इतर पक्षांच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज शिवसेनेत परतुर येथील जिल्हा संपर्क कार्यालयात  जाहीर प्रवेश केला. 
   अग्रवाल यांनी परतुर विधानसभा मतदार संघात केलेल्या विकास कामाचा लावलेला सपाटा पाहता आमच्याही गावात विकास कामे व्हावेत या दृष्टीने आसनगाव येथील अनेक नागरिकांनी इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यानिमित्त व्यासपीठावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रल्हादराव बोराडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब चिखले, तालुकाप्रमुख अमोल सुरुंग, ओबीसी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव तरवटे,संघटक विजयकुमार गिरी, युवासेना तालुकाप्रमुख अविनाश कापसे, उपतालुकाप्रमुख सोपानराव कासारे, नितीन राठोड विभाग प्रमुख अंगद खरात,वैद्यकीय पक्षाचे कैलास चव्हाण यांच्या उपस्थितीत खालील आसनगाव येथील नागरिकांनी अंगद खरात यांच्या पुढाकाराने सदरचा प्रवेश सोहळा पार पडला, यामध्ये उपसरपंच  रामकिसन खरात, किसनराव धोंडे,साहेबराव शिंदे, बबनराव जाधव, वेंकटेश खरात, माऊली खरात, हनुमान खरात, माणिक शेळके, गोविंद दादा खरात, भागवत दांगट, ज्ञानेश्वर खरात, विजय मोरे, अशोक सोनटक्के, गोविंद शिंदे, विठ्ठल खरात मंत्री, सुदाम खरात,बबनराव जाधव,परमेश्वर खरात, गोरख नाटकर,रामकिसन खरात, उपसरपंच बाबा राम गरड, गोविंद खरात, संतोष नाटकर, कुमार खरात, विकास शिंदे,सुभाष खरात, विठ्ठल खरात, सोपान पवार,नेमिनाथ नाटकर, वेंकटेश खरात,माऊली खरात, हनुमान खरात, माणिक शेळके, यांच्यासह आदी आसनगाव येथील नागरिकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत